MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. केकेआरने तब्बल 12 वर्षानंतर मुंबईला घरच्या मैदानावर मात दिली. सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (MI vs KKR) मुंबईला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ 18.5 ओव्हरमध्ये 145 धावांत गारद झाला. त्यामुळे केकेआरने 24 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. सामना भलेही हरला असेल, पण चर्चेत राहुला तो मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटचा निर्णय... कालच्या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर टीका होताना दिसली. हार्दिक पांड्याला आता कॅप्टन्सीसाठी रोहित शर्माच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सोशल मीडियावर सवाल विचारला जात होता. त्यावर आता मुंबईचा स्टार गोलंदाज पियुष चावला (Piyush Chawla) याने स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिकने रोहितला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळवलं? असा सवाल विचारला जात होता.


पियुष चावलाचं स्पष्टीकरण 


इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या रोहितला खास इम्पॅक्ट दाखवता आला नाही. रोहित 12 बॉलमध्ये 11 धावा करून बाद झाला. मात्र, रोहितने मिचेल स्टार्कला मारलेला खणखणीत षटकार सर्वांच्याच लक्षात राहिला. रोहित शर्मा फलंदाजीला आला तेव्हा तो अवघडलेल्या स्थितीत दिसत होता. त्यावर पियुष चावला याने स्पष्टीकरण दिलं. रोहित शर्माची पाठ दुखत होती. त्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्यात आलं होतं, असा खुलासा पियुष चावला याने केला आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या दृष्टीने आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 


संपूर्ण मोसमात एक युनिट म्हणून आम्ही अपयशी ठरलो. या मोसमात जरी आम्ही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालो असलो तरी, उर्वरित सामन्यांमध्ये आम्ही आपल्या संघ म्हणून चांगली कामगिरी करू. टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला लय कायम ठेवण्याची गरज असते. जे या हंगामात आमचा संघ करू शकला नाही. त्याचा फटका आमच्या संघाला बसला, असं पियुष चावला याने म्हटलं आहे. 


मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर),  सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी , पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा.


कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.