मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई विरुद्ध लखनऊ सामना झाला. या सामन्यात लखनऊने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर टीममधील खेळाडूंना मोठा दणका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के एल राहुलने मुंबई विरुद्ध सामन्यात शतक झळकवलं. 62 बॉलमध्ये 103 धावा केल्या. सामना जिंकल्याचा आनंद साजरा करण्याआधीच टीमला मोठा दंड भरावा लागला. त्यामुळे आनंदावर विरजण पडलं. 


मुंबई विरुद्ध सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. या आधी 12 लाख रुपयांचा दंड लखनऊन टीमने स्लो ओव्हर रेटसाठी भरला होता. 


आयपीएलमध्ये लखनऊ टीमला दुसऱ्यांदा दंड भरावा लागला आहे. कॅप्टनवर 24 लाख रुपयांचा तर इतर 11 खेळाडूंवर 6 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली. 


मुंबई टीमवर लखनऊने 36 धावांनी सामना जिंकला आहे. मुंबईचा सलग आठवा पराभव आहे. लखनऊ टीम प्लेऑफपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. लखनऊने यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे.