IPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 9 वा सामना मुंबई विरुद्ध राजस्थान झाला. राजस्थाननं मुंबईवर 23 धावांनी विजय मिळवला. मुंबई टीमचा सलग दुसरा पराभव झाला. या सामन्यामध्ये मुंबई टीमच्या खेळाडूमुळे एक मोठी दुर्घटना घडली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याआधी देखील असा प्रकार लखनऊ विरुद्ध चेन्नई सामन्यात घडला होता.
मुंबई पराभूत होत असताना एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. टिळक वर्माने षटकार ठोकला. बॉल थेट बाउंड्रीबाहेर उभ्या असलेल्या कॅमेऱ्यामनच्या डोक्याला जोरात लागला. ट्रेंट बोल्टने तातडीनं त्यांच्याजवळ जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सुदैवानं कॅमेऱ्यामनला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे थोडक्यात निभावलं. पण लेदर बॉल डोक्याला गंभीर दुखापतही करू शकतो. मात्र सुदैवानं थोडक्यात निभावलं, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना सामना सुरू असताना 12 व्या ओव्हरमध्ये घडली. राजस्थानचा स्पिनर रियान पराग बॉलिंग करत होता. पाचव्या बॉलदरम्यान टिळक वर्माने षटकार ठोकला. बॉल थेट कॅमेऱ्यामनच्या डोक्याला लागला. या दुर्घटनेमुळे काही वेळ मैदानात थोडं तणावाचं वातावरण होतं.
ही घटना पहिल्यांदा घडली असं नाही. याआधी आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध चेन्नई सामन्यातही असा प्रकार घडला होता. आयुष बदोनीनं ठोकलेल्या षटकारामुळे एक महिला जखमी झाली होती. आयुषने एवढा जोरात आणि लांब सिक्स ठोकला की तो थेट प्रेक्षक गॅलरीतल्या महिलेच्या डोक्याला लागला.
मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. राजस्थानने मुंबईवर 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या दुसऱ्या पराभवामुळे कॅप्टन रोहित शर्मा संतापला आहे. रोहितने टीममध्ये बदल करण्याचे संकेत दिले.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="und" dir="ltr"><a href="https://t.co/MnWdf3Cpaz">https://t.co/MnWdf3Cpaz</a> <a href="https://twitter.com/hashtag/TilakVarma?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#TilakVarma</a></p>— ANOOP DEV (@AnoopCricket) <a href="https://twitter.com/AnoopCricket/status/1510428946893926401?ref_src=twsrc%5Etfw">April 3, 2022</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>