Hardik Pandya : बुमराहला एकच ओव्हर का दिली? `बॅड कॅप्टन्सी` म्हणत युसूफ पठाणने पांड्याला झापलं, म्हणतो...
Yusuf Pathan On Hardik Pandya : जसप्रीत बुमराहला पहिल्या 11 ओव्हरमध्ये फक्त 1 ओव्हर दिल्याने आता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याच चांगलाच ट्रोल होतोय.
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात हैदराबादने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे पहिल्या 10 षटकात 2 बाद 148 धावा केल्या होत्या. त्यानंतर हेनरिक क्लासेनने केलेल्या आक्रमक फलंदाजीनंतर मुंबईच्या गोलंदाजांची दैना उडाली होती. कॅप्टन हार्दिक पांड्यासह (Hardik Pandya) सर्व गोलंदाजांची हजेरी हैदराबादच्या गोलंदाजांनी घेतली. मात्र, आता कॅप्टन पांड्याच्या एका निर्णयावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
हैदराबादने पहिल्या 7 ओव्हरमध्येच 100 धावा पूर्ण केल्या होत्या. पीयूष चावला, क्वेना मफाका, जेराल्ड कोएत्झी यांना चांगलाच चोप मिळाला. मात्र, पहिल्या 12 ओव्हरमध्ये बुमराहला फक्त 1 ओव्हर देण्यात आली होती. त्यामुळे आता हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता वर्ल्ड कप विनर माजी खेळाडू युसूफ पठाणने पांड्याची शाळा घेतली आहे.
काय म्हणतो युसूफ पठाण?
सनरायझर्स हैदराबादने पहिल्या 11 ओव्हरमध्ये 160 हून अधिक धावा केल्या होत्या आणि तोपर्यंत जसप्रीत बुमराहला फक्त एकच ओव्हर का देण्यात आली होती? अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बेस्ट बॉलरकडून बॉलिंग करून घेयला हवी, असं मत युसूफने मांडलं आहे. हे एका खराब कॅप्टन्सीचं लक्षण आहे, असं म्हणत युसूफ पठाण हार्दिक पांड्याच्या नाराजी व्यक्त केली.
सनरायझर्स हैदराबाद संघ - ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
मुंबई इंडियन्स संघ - इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.