सामन्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा महिला टेनीसपटूचा दावा
वोज्नियाकीने हे वक्तव्य तेव्हा केले जेव्हा ती ८२व्या स्थानावर असलेल्या मोनिका प्यूगा हिच्याकडून मियामी ओपनमध्ये ०-६,६-४,६-४ अशा फरकाने पराभूत झाली होती.
नवी दिल्ली: सुप्रसीद्ध डॅनिश प्लेयर आणि सध्याची क्रमांक दोनची खेळाडू कॅरोलीन वोज्नियाकीने एक आश्चर्यकारक दावा केला आहे. वोज्नियाकीचा दावा आहे की, मियामी ओपन दरम्यान तिला आणि तिच्या परिवाराला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. वोज्नियाकीने हे वक्तव्य तेव्हा केले जेव्हा ती ८२व्या स्थानावर असलेल्या मोनिका प्यूगा हिच्याकडून मियामी ओपनमध्ये ०-६,६-४,६-४ अशा फरकाने पराभूत झाली होती.
धमकीमुळे माझ्या नातेवाईकांची मुले चांगलीच घाबरली
वोज्नियाकीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या पोस्टमध्ये या घटनेबाबत लिहिले आहे. तीने म्हटले आहे गेल्या रात्री मी मियामी ओपनमध्ये माझी मोनिका प्यूगासोबत कडवी टक्कर झाली. मला चांगलेच माहिती आहे की, टेनिसमध्ये जय-पराजय राहतोच. मात्र, मी आपणास सांगू इच्छिते की, सामन्यादरम्यान काही मंडळींनी मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे माझ्या नातेवाईकांची मुले चांगलीच घाबरली होती. ही मुले साधारण १० वर्षांची आहेत. सामन्यादरम्यान सुरक्षरक्षांनी आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाढली नाही.
मोनिका म्हणते मी काही ऐकले नाही
दरम्यान, वोज्नियाकीच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मोनिका प्यूगाने म्हटले आहे की, सामना सुरू असताना मी तरी असे काही ऐकले नाही. मात्र, तो सामना सुरू असताना प्रेक्षक मात्र फार उत्साही होते. पण, जर वोज्नियाकीने काही म्हटले असेलच तर, अशी काही घटना माझ्यासमोर तरी घडली नाही.