मुंबई : आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग आरोपात २ वर्षे बाहेर असलेल्या चेन्नई संघाने पुनरागमन करताना कोणतीच कसर सोडली नाहीए.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वेळा चॅम्पिअन झालेल्या या टीमने एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना टीममध्ये घेतले.


तर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माइक हसीला देखील टीमशी जोडले आहे. 


मिस्टर क्रिकेटर


आयपीएलच्या ७ सिरीजमध्ये चेन्नई टीमसोबत खेळाडू म्हणून जोडला गेलेला माइक हसी आता बॅट्समन कोच म्हणून टीम सोबत असणार आहे.


'मिस्टर क्रिकेटर' अशी ओळख असलेला हसी चेन्नईसाठी धोनी आणि रैनानंतर सर्वात जास्त रन्स करणारा तिसरा बॅट्समन आहे.



युवा खेळाडूंना प्रेरणा देणार 


२०१३ मध्ये हसीला चैन्नईसाठी बॅटींग करताना ऑरेंज कॅपही मिळाली होती.


'एक खेळाडू म्हणून खूप वर्षे खेळल्यावर अनेक आठवणी आहेत, चेन्नई टीममध्ये खूप सारे मित्र आहेत. मी पुन्हा टीमशी जोडला जात असल्याचा आनंद आहे. युवा खेळाडूंना प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न राहील,' असे हसीने सांगितले.