मु्ंबई : आयपीएल 2020 चा हंगाम संपला आहे. या हंगामात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. या हंगामात काही मोठ्या नावांनी निराश केले असताना, काही युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी करून चर्चेत आले आहेत. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल, संजू सॅमसन, देवदत्त पडीकक्कल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव या फलंदाजांनी चांगला खेळ केला. आता इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनने या मोसमातील पाच सर्वोत्कृष्ट फलंदाजांची निवड केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखती दरम्यान मायकेल वॉनने आयपीएल २०२० मधील पाच सर्वोत्कृष्ट फलंदाजांची निवड केली. या यादीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार केएल राहुल याचा समावेश आहे. आयपीएलच्या १३ व्या सत्रात केएलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झाला. वॉनने मुंबईचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉकला पाच फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान दिले. या मोसमात त्याने मुंबईकडून १५ सामन्यांत ५०३ धावा केल्या आणि या संघाच्या यशस्वी फलंदाजांपैकी तो एक होता.


मायकेल वॉनने मुंबईचा अष्टपैलू किरोन पोलार्डला तिसरं स्थना दिलं आहे. त्याने १६ सामन्यात २६८ रन केले. या हंगामात पोलार्डने आपल्या संघासाठी महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी केली. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले आणि संघासाठी गोलंदाजीची भूमिका ही बजावली. चौथ्या क्रमांकावर त्याने मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याला स्थान मिळवून दिले. त्याने १४ लीग सामन्यांत १७८.९८ च्या स्ट्राइक रेटने २८१ धावा केल्या. तर पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली विरुद्ध त्याने १४ बॉलमध्ये ३७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०० पर्यंत पोहोचली आणि मुंबईने सामना जिंकून थेट अंतिम फेरी गाठली.


इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने सूर्यकुमार यादव याचे कौतुक केले आणि या मोसमातील पाच सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान दिले. सूर्यकुमारने या मोसमात मुंबईकडून १४ सामन्यांत ४८० धावा केल्या आणि संघाला चॅम्पियन बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.