मुंबई: 'फ्लाइंग सिख' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. पत्नीनंतर त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. मिल्खा सिंह यांचं कोरोनामुळे रात्री उशिरा निधन झालं. मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मोहालीजवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनातून रिकव्हर होत असताना त्यांना घरी आणण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे पुन्हा एकदा उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री उशिरा निधन झालं आहे.




मिल्खा सिंह यांच्या पत्नीचा 5 दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मिल्खा सिंह यांचा 2 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंडीगढ़ पीजीआई रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.