वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेली मीराबाई एकेकाळी सोडणारी होती खेळ...
वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पिंयनशीपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेली मीराबाई चानू हिचा हा प्रवास काही फार सोपा नव्हता.
नवी दिल्ली : वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पिंयनशीपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेली मीराबाई चानू हिचा हा प्रवास काही फार सोपा नव्हता.
टिकेला सामोरे जावे लागले
रियो ऑल्मिपिकमध्ये आलेल्या अपयशानंतर तिला लोकांच्या टिकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे ती अत्यंत खचून गेली. तिचे इतके खच्चीकरण झाले की तिने खेळ सोडण्याचा विचार केला होता.
काय म्हणाली मीराबाई ?
याबद्दल तिने सांगितले की, मी दिवसरात्र परिस्थिती कशी बदलेल, याचाच विचार करत होते. मात्र नंतर मी चांगली कामगिरी करण्याचा निर्णय घेतला. कारण लोकांचे तोंड बंद करण्याचा तोच एक मार्ग होता.
चानूने सांगितले की, आपल्या खेळावर तिने खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर अपयशातून बाहेर येण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीचा फायदा
पुढे ती म्हणाली की, खरंच मी ऑल्मिपिकमध्ये वाईट कामगिरी केली होती. त्याचबरोबर मी क्लीन आणि जर्कमध्ये अपयशी ठरले. मी याबद्दल माझ्या कोचशी बोलून सरावात काही बदल केले. या सगळ्यात मानसोपचारतज्ज्ञांनी मोठी भु्मिका निभावली आहे. मी दर दोन महिन्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेत होते. त्यामुळे मला नक्कीच फायदा झाला.
लक्ष्य
वर्ल्ड चॅम्पिंयनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते आणि ते मी साकारले आहे. आता माझे लक्ष्य आशियाई खेळ, राष्ट्रीय खेळ आणि २०२० चे ऑल्मिपिकमध्ये पदक जिंकणे हे आहे.