नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियन आणि 2018 मध्ये कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल देणारी मीराबाई चानूने राष्ट्रीय शिबीर दरम्यान तिच्य़ा खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली आहे. आयडब्ल्यूएफचे महासचिव सहदेव यादव यांनी मंगळवार म्हटलं की, मीराबाई चानूने खेळ मंत्रालयाला तिच्या खोलीत सीसीटीव्ही लावण्याची विनंती केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीराबाईवर मागील चार वर्षांमध्ये 45 डोपिंग टेस्ट झाली. पण ती प्रत्येक वेळी यातून निर्दोष सूटली. तिला भीती आहे की तिला डोपिंग प्रकरणात फसवण्यासाठी तिच्या जेवणात काही मिसळलं जाऊ शकतं. आयडब्ल्यूएफने मंत्रालयाला महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही लावण्याचा आग्रह केला आहे.


आयडब्ल्यूएफचे महासचिव सहदेव यादव यांनी म्हटलं की, आम्ही भारतीय खेळ प्राधिकरण आणि खेळ मंत्रालयाला एनआय़एस पटियालामध्ये राष्ट्रीय शिबीरमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. कारण आम्हाला कळेल की तिथे काय होत आहे. आम्हाला कोणत्याही खेळाडूला डोपिंग प्रकरणात अडकतांना पाहायचं नाहीये'.