मुंबई : सैखोम मीराबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.


ठरली दूसरी भारतीय वेटलिफ्टर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

194 किलोग्रॅम (85 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लीन अँड जर्क) वयोगटात चानूने गोल्ड मेडल मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारी ती दूसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे.  22 वर्षापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकत वर्ल्ड चँम्पियन बनली होती.


याआधी कर्णम मल्लेश्वरीने केला होता हा कारनामा


अमेरिकेच्या अनाहिममध्ये आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 48 किलोग्रॅम वजनी गटात भाग घेत 85 किलोग्रॅमपासून तिने सुरुवात केली. यानंतर 109 किलोग्रॅम भार उचलत तिने भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं. याआधी 1995 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं.