Mirabai Chanu Wins Silver: भारताची वेटलि्फ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने एकूण 200 किलो वजन उचलून सिलव्हर मेडल पटकावले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत ती दुखापतग्रस्त झाली होती, मात्र तरीही हार न मानता भारतासाठी तिने पदक पटकावल आहे.त्यामुळे सर्वत्र तिच्या कामगिरीचे कौतूक होत आहे. 


ऑलिम्पिक चॅम्पियनला पछाडलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलंबियातील बोगोटा येथे झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनच्या वेटलिफ्टर जियांग हुइहुआने 206 किलो वजन उचलून गोल्ड मेडल जिंकले आहे. तर भारताच्या मीराबाई चानूने एकूण 200 किलो वजन उचलून सिलव्हर मेडल जिंकले आहे.. मीराबाई चानूने ऑलिम्पिक चॅम्पियन हौ झिहुईला पछाडत हे पदक जिंकले आहे.  चिनी वेटलिफ्टर हौ झिहुईने 198 किलो वजन उचलून ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. झिहुई ही 49 किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते.


दुखापतग्रस्त असून सुद्धा मेडल जिंकल 


वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती दुखापतग्रस्त होती. मात्र तरीही ती खचली नाही आणि तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये सिलव्हर मेडल पटकावले. दरम्यान स्नॅचच्या प्रयत्ना दरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला होता, मात्र  तिने शानदार बचाव केला. अशा परिस्थितीत शरीरावर ताबा ठेवत तिने गुडघ्याचा आणि खालच्या शरीराचा आधार घेतला. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण 200 किलो वजन उचलले.


किती किलो वजन उचलले?


जियांग हुइहुआने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो आणि स्नॅचमध्ये 93 किलो वजन उचलले. अशाप्रकारे तिने एकूण 206 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. झिहुईने क्लीन अँड जर्कमध्ये 109 किलो वजन आणि स्नॅचमध्ये 89 किलो वजन उचलले. तर मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो आणि स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचलेले. यामुळे झिहुईला ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावे लागले, तर मीराबाईने सिलव्हर मेडल पटकावले.


मीराबाई चानुने दुखापतग्रस्त असून सूद्धा भारतासाठी सिलव्हर मेडल पटकावले आहे. त्यामुळे तिच्या या कामगिरीचे देशवासियांकडून कौतूक होत आहे.