नवी दिल्ली : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan). विश्वचषकात भारताविरुद्ध पराभवाची परंपरा मोडण्यासाठी पाकिस्तानचा संघ रणनिती आखतोय. पण त्याआधीच पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ आलं आहे. पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) वर गंभीर आरोप केले आहेत. 


दिग्गज क्रिकेटपटूचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत तो व्यवस्था बदलत नाही आणि बळीचा बकरा शोधण्याची सवय बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेटमध्ये कोणतीही सुधारणा होणार नाही असा आरोप पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिसबाह उल हक याने केला आहे. गेल्या महिन्यात अचानक राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच बोलताना मिसबाह म्हणाला पाकिस्तान क्रिकेटमध्ये वरच्यावर बदल करुन काही होणार नाही, समस्या व्यवस्थेत खोलवर रुतली आहे. आमचं क्रिकेट केवळ निकाल पाहतो, पण पुढील योजना आणि प्रणाली सुधारण्यासाठी आमच्याकडे वेळ किंवा संयम नाही.


खेळाडूंचा स्थानिक पातळीवरच विकास होणं गरजेचं आहे, नंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कौशल्य विकासावर काम करावं लागेल, पण या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला फक्त परिणाम हवे आहेत आणि जर परिणाम मिळाले नाहीत तर आम्ही कुणाला तरी बळीचा बकरा म्हणून शोधू लागतो. असा आरोप मिसबाहने केला आहे.


मिसबाह उल हकबरोबरच बॉलिंग कोच वकार यूनिस यांनी गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन परतल्यावर अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मिसबाह उल हकने क्रिकेट व्यवस्थापनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 


प्रशिक्षक किंवा खेळाडू बदलता येतील पण मूळ समस्या तशीच राहिल, अशी टीका मिसबाहने केली आहे. याबरोबरच त्याने राष्ट्रीय निवड समितीच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि टी20 विश्वचषकासाठी संघात करण्यात आलेल्या बदलांवरही जोरदार टीका केली आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी काही खेळाडूंची संघात निवड होते आणि 10 दिवसांनंतर ज्या खेळाडूंना बाहेर केलं त्यांना संघात घेतलं जातं, हे काय सुरु आहे, असा सवालही मिसबाहने उपस्थि केला आहे.