Video : धन्य ते फिल्डर! एका बॉलवर 3 वेळा रनआऊट करण्याची संधी गमावली
नामिबिया आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली.
दुबई : नामिबियाच्या टीमने T20 वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला आहे. रोमहर्षक सामन्यात आयर्लंडचा पराभव करून नामिबियाने आता सुपर -12 फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. तर आता सुपर 12 फेरीत नामिबियाला भारताचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान नामिबिया आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. आयर्लंड आपल्या डावाचा शेवटचा चेंडू खेळत असताना, चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागला आणि विकेटजवळ थांबला. गोलंदाजाने चेंडू विकेटच्या दिशेने फेकला, पण तो स्टंपला लागला नाही आणि तो फलंदाज धावबाद होण्याची संधी हुकली.
यानंतर कीपरनेकडूनही तो चेंडू चुकला त्यामुळे चेंडू बाऊंड्री लाईनवर पोहोचला. त्याठिकाणाहून फिल्डरने पुन्हा चेंडू फेकला. त्यानंतर विकेटकीपरने पुन्हा रनआऊट करण्याची संधी गमावली. यावेळी विकेटकीपरने दुसऱ्या टोकाला चेंडू थ्रो केला आणि पुन्हा असं घडलं की फिल्डरकडून पुन्हा एकदा रनआउट मिस झाला.
म्हणजेच फलंदाज एकाच चेंडूवर तीन वेळा रनआऊट होताना वाचला. यावेळी धावताना फलंदाजांनी तीन धावा काढल्या. क्रिकेटच्या मैदानावर असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं, जिथे एकाच चेंडूवर तीन वेळा रनआउटची संधी असते आणि तिन्ही वेळा ती संधी हुकली जाते.
आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये केवळ 125 धावा केल्या, जे नामिबियाने 18.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. नामिबियासाठी सर्वात मोठा स्टार डेव्हिड विझीने दोन विकेट्स घेतले आणि 14 चेंडूत 28 धावा केल्या.