मुंबई : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेटपटू मिताली राज ठरलीये. मितालीने शनिवारी आशा व्यक्त केली की तिची कामगिरी देशातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल.


राष्ट्रपतींच्या हस्ते मितालीला खेलरत्न अवॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला क्रिकेटच्या या 38 वर्षीय दिग्गज खेळाडूला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्नने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या 12 खेळाडूंपैकी मिताली एक आहे.


पुरस्कार मिळाल्यानंतर मितालीची भावनिक पोस्ट


हा पुरस्कार मिळाल्यानंतर मितालीने ट्विटरवर लिहिलं की, "खेळातील महिला या बदलाच्या शक्तिशाली उत्प्रेरक असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पात्रतेचं कौतुक मिळतं, तेव्हा त्या इतर अनेक महिलांना त्यांच्या स्वप्नांचं अनुसरण करण्यास प्रेरित करतात."



तरूण मुलींना मिळणार प्रेरणा


भारतीय महिला कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मितालीच्या म्हणण्याप्रमाणे, 'मला मनापासून आशा आहे की माझा प्रवास देशभरातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.' 


मितालीने 220 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भरारत देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.