न्यूझीलंडविरुद्ध मितालीचे शानदार अर्धशतक, ५० अर्धशतके पूर्ण
क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने शानदार अर्धशतक झळकावले.
डर्बी : क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने शानदार अर्धशतक झळकावले.
तिच्या अर्धशतकाच्या जोरावरच भारताने १००चा टप्पा पार केलाय. ७१ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच वनडेमध्ये तिचे हे ५०वे अर्धशतक आहे.
न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिले दोन्ही सलामीवीर झटपट गमावले. स्मृती मानधना आणि पूनम राऊत लवकर बाद झाल्या. त्यानंतर मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी खेळपट्टीवर टिकून राहताना संघाला शंभरी पार करुन दिली.