नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मितालीबरोबरच पंजाबची धडाकेबाज बॅट्समन हरमनप्रीत कौर आणि ऑलराऊंडर दीप्ती शर्माचाही या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. या टीममध्ये इंग्लंडच्या पाच, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी तीन-तीन तसंच ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपटूला स्थान देण्यात आलंय. 


आयसीसीच्या पाच सदस्यीय सिलेक्शन पॅनलनं या टीमची निवड केली. यामध्ये आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अॅलारडी, वेस्ट इंडिजचा माजी फास्ट बॉलर इयान बिशप, माजी इंग्लंड कॅप्टन शार्लेट एडवर्ड्स, भारताची माजी क्रिकेटर स्नेहल प्रधान आणि ऑस्ट्रेलियाची माजी ऑलराऊंडर लिसा स्थळेकरचा समावेश आहे.