नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे बॅट्समन रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार देखील वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून २ वेळा भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी महिला क्रिकेटपटू ऑफ द इयरच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचणाऱ्या मितालीने ऑस्ट्रेलियाच्या मेग लँन्गिंगला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये नाही खेळू शकले. यामुळे ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. मितालीचे 753 गुण आहेत तर एलिस आणि एमीचे अनुक्रमे 725 आणि 720 गुण आहेत.


तर भारताची झुलन गोस्वामी ही वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोस्वामीचे 652 अंक आहेत. दक्षिण आफ्रिकेची मारियेन केप 656 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 


आस्ट्रेलियाने आयसीसी महिला चॅम्पियनशिप सिरीजमध्ये इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवत आणखी ४ गुण मिळवले आणि ऑस्ट्रेलियाची टीम अव्वल स्थानावर पोहोचली आहे.