Mohammad Amir Action in PSL: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (mohammad amir) सध्या पाकिस्तान सुपर लीगमधील (psl match) कामगिरी व्यतिरीक्त मैदानांवरील चाळ्यांमुळे अनेकदा चर्चेत असल्याचं चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका सामन्यात डावखुरा फलंदाज आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला गोलंदाजी करताना केलेल्या एका कृतीवरुन सध्या आमिरविरोधात टिकेची झोड उठली आहे. आमिरची ही कृती पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही यासंदर्भात आमिरला समजूत दिली आहे. आफ्रिदीच्या शब्दांचा आमिरवर काही विशेष परिणाम झाल्याचं दिसत नाही. याच सामन्यादरम्यान आमिरने विकेट घेतल्यानंतर एक अश्लील इशारा केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने यापूर्वी रागात बाबरकडे पाहत क्रिजवर चेंडू जोरात आपटला होता. त्यानंतर सोशल मीडियावरुन त्याला अनेकांनी सुनावलं होतं. त्यानंतर आता केलेल्या एका कृतीमुळे चाहते पुन्हा संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये आमिर रागात व्यक्त होताना हात कंबरेखाली नेऊन झटकताना दिसत आहे. 


आफ्रिदीने दिली समज...


आमिरच्या वागण्याबद्दल प्रतिक्रिया देताना आफ्रिदीने, "जेव्हा एखादा खेळाडू चांगलं खेळत नाही किंवा खेळत असला तरी मी त्याला त्याच्या वागण्याबद्दलचे संकेत बोलण्यातून देत असतो. मी काल असाच मेसेज आमिरसाठी सोडला. मी त्यांना सन्मानाने सांगितलं. मात्र नंतर मी त्याला ओरडलोही," असं सांगितलं. आमिरबरोबर काय संवाद झाला याबद्दल बोलताना आफ्रिदीने, "मी त्याला म्हणालो, तुला काय हवं आहे? तू एवढा सन्मान मिळवला आहे. तू तुझ्या प्रतिष्ठेला डाग लावला आणि तिथून पुन्हा तू पुनरागमन केलं आहे. तुला एका पद्धतीने हे नवीन जीवनदान मिळालं आहे. तू आता काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय?" असं विचारल्याचं माजी कर्णधाराने सांगितलं.



अनेकजण तुम्हाला पाहत असतात


"ही काही वागण्याची योग्य पद्धत नाही. तुमच्या आजूबाजूला ज्युनियर खेळाडू असतात. तू चुकीच्या शब्दांचा वापर करतो. असे अनेक चाहते आहेत जे हे पाहून दु:खी आणि निराश झाले आहेत. आम्ही सुद्धा कधीतरी असे शब्द वापरले आहेत. आम्हालाही कॅमेरांनी टीपलं आहे. मात्र इथं आपलं कुटुंब आहे. टीव्हीवरुन आपल्याला सर्वजन पाहत आहेत याचं भान असलं पाहिजे. आक्रमता आपल्या जागी आणि खेळ आपल्या जागी. आक्रमता नियंत्रणात ठेवता आली पाहिजे," असं आफ्रिदी म्हणाला.


शाहीन शाह आफ्रिदीही झाला थक्क


पाकिस्तानी संघातील सध्याचा आघाडीचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही बाबरबद्दल आमिरने केलेली कृती पाहून धक्का बसल्याचं नमूद केलं. आमिरचं वागणं हे कायमच वादग्रस्त राहिलं आङे. मात्र यामधून त्याने काही शिकवण घेतील आहे असं दिसलेलं नाही.