Virat Kohli : नेमकी चूक कोणाची? अंपायरच्या निर्णयावर मोहम्मद कैफने चांगलंच झापलं, म्हणतो...
Virat Kohli Wickets : बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात विराट कोहलीला देण्यात आलेल्या बाद निर्णयामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) टीका केली आहे.
Mohammad Kaif On Virat Kohli wicket : कोलकाताने बंगळुरुसमोर 222 धावांचा डोंगर उभा केला होता. बंगळुरु टीमने आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली पण अखेरच्या क्षणी बंगळुरूला फक्त 1 रनमुळे सामना गमवावा लागला. सामना अटीतटीचा झाला खरा पण अंपायर्सने विराट कोहलीला (Virat Kohli) दिलेल्या एका निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला तरी थर्ड अंपायरने नो बॉल (No Ball) दिला नाही. विराटला बाद देण्यात आलं. त्यामुळे अंपायर्सच्या राग विराटला आला होता. त्यानंतर विराटने वाद देखील घातला. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला मोहम्मद कैफ?
विराट कोहलीला ज्याप्रकारे बाद देण्यात आलं. तो अत्यंत चुकीचा निर्णय होता. शिवाय, धोनीच्या बॅटखाली गेलेला चेंडू वाईड घोषित केला. कॅमेरा, रिप्ले, तंत्रज्ञान पण तरीही अशा चुका होत आहेत, असं मोहम्मद कैफने म्हटलं आहे. तसेच खराब अंपायरिंग होत असल्याचं कैफने बोलून दाखवलं. एका बॉलवर कोणताही फलंदाज 10 प्रकारे बाद होऊ शकतो. एका ओव्हरमध्ये 60 वेळा फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळते, असंही मोहम्मद कैफ म्हणतो.
पण आता विराट कोहली बीमरवर बाद झालाय. त्याचा देलेला निर्णय खूपच चुकीचा होता. हर्षद राणाचा बॉल नक्कीच फुल टॉस होता. तो कंबरेचा वर होता. कोणताही फलंदाज अशा बॉलच्या तयारीत नसतो. नक्की बॉल प्रोजेक्शनमध्ये खाली दिसत असेल पण असे बॉल फलंदाजांसाठी नो बॉल असतात. त्यामुळे अत्यंत खराब अंपायरिंग होती, असं मोहम्मद कैफने म्हटलं आहे.
पाहा Video
आयसीसीचा नियम काय?
दरम्यान, जर कोहली क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेपासून 0.92 मीटर उंचीवर आला असता. कोहलीच्या कमरेची उंची 1.04 मीटर आहे. त्यानुसार हा चेंडू नो-बॉल मानता येत नाही. आयसीसीच्या नियम 41.7 नुसार, जर गोलंदाजाने कंबरेच्या वर बॉल टाकला तर तो नो बॉल मानला जातो. परंतू विराट कोहली क्रिझच्या पुढे आल्याने त्याला बाद देण्यात आलं.