Mohammad Kaif, World Cup 2023: आगामी वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) आता फक्त पावनेदोन महिने शिल्लक आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी सर्व संघ कसून तयारी करताना दिसत आहेत. वर्ल्ड कपचा संघ म्हटलं तर फक्त रोहित आणि विराट या दोन खेळाडूंची नावं समोर येतात. त्यामुळे संघात इतर खेळाडू कोण असतील. ओपनिंग पासून मिडल ऑर्डर अजूनही फिक्स नाही. मॅनेजमेंट सतत प्रयोग करत असल्याने संघातील इतर 9 खेळाडू कोण? यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे बीसीसीआयवर (BCCI) मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता माजी फलंदाज मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन केलं आहे.


नेमकं काय म्हणाला मोहम्मद कैफ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला विश्वास आहे की, जर जसप्रीत बुमराह टीम इंडियामध्ये परत आला तर तो संघासाठी 50 टक्के जिंकवण्याचं काम करतो. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरसारखे काही खेळाडूही परत आले तर वर्ल्ड कप खेळाडू संघात येत आहे, असा त्याला अर्थ होईल, असं कैफ म्हणाला आहे. यशस्वी जयस्वालने वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगली फलंदाजी केली. त्यावेळी त्याला वर्ल्ड कप संघात संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, ते एवढं सोप्पं असणार नाही. जेव्हा बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू कमबॅक करतील, त्यावेळी मोहम्मद सिराज सारख्या खेळाडूंना संघात संधी मिळेल, याची शक्यता कमी आहे, असंही मोहम्मद कैफने म्हटलं आहे.


श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे, केएल राहुल दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे मला आशा आहे की दोन्ही खेळाडू येत्या काळात वर्ल्ड कपच्या आधी संघात परत येतील. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संघात संधी मिळणार नाही, तुमची इलेव्हन पूर्ण तयार असेल. तुमच्याकडे रोहित आणि शुभमन गिल हे सलामीसाठी असती. तर वन डाऊनला विराट तयार असेल. चार नंबरवर तुमच्याकडे श्रेयस अय्यर आहे आणि पाच नंबरवर के एल राहुल उतरू शकतो. हार्दिक पांड्या 6 व्या तर जडेजा 7 वर खेळेल. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर परिस्थितीनुसार संघात असू शकतो. तर कुलदीप यादव 9 व्या क्रमांकावर असेल. त्याचबरोबर नंबर 10 आणि 11 साठी मोहम्मद शमी आणि बुमराह असतील, असं मोहम्मद कैफ म्हणाला आहे. तर संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव किंवा मोहम्मद सिराज बॅकअप खेळाडू म्हणून असू शकतात, असंही कैफ म्हणाला आहे.


आणखी वाचा - वर्ल्ड कपआधी पाकिस्तानची मोठी घोषणा; सेहवागशी पंगा घेणाऱ्याला अचानक बनवलं चीफ सेलेक्टर!


मोहम्मद कैफने वर्ल्ड कपसाठी निवडलेली प्लेईंग XI


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/ शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह


दरम्यान, बुमराह फिट आहे की नाही? ऋषभ पंतचं काय होणार? केएल राहूल की श्रेयस अय्यर? अशी मोठी परीक्षा आता चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कधी जाहीर होणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.