जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत विराट सेनेनं अशक्यप्राय विजय शक्य करुन दाखवला...वाँडरर्सच्या खडतर खेळपट्टीवर कोहलीच्या संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली...


भारताचा टिच्चून मारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीनं टीम इंडियाचं कसोटी विजयाचं स्वप्न सत्यात उतरवलं. कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेनं भारताच्या विजयाचा घास अक्षरक्ष: हिरावून घेतला  होता. मात्र, दुस-या आणि तिस-या सत्रात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-यानं भारताला हा विजय साकारता आला. 


सामना जिंकला मात्र मालिका गमावली


कोहलीच्या संघानं सामना जिंकला मात्र, त्यांना मालिका 2-1 नं गमवावी लागली. पहिल्या दोन कसोटीत टीम इंडिया लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकली नाही. मात्र, तिस-या कसोटीत भारतीय संघानं मैदानावर आपल्या कामगिरीनं सा-यांनाच आपली बोटं तोंडात घालायला भाग पाडली. आता आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असेल.


मोहम्मद शमीबरोबर, भुवनेश्वर कुमार आणि अजिंक्य रहाणेनंही या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आता एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया यजमान आफ्रिकन संघाला कडवी टक्कर देईल अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना असेल.