तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा हिरो ठरला शमी मात्र, ममता सरकारने केला अपमान
दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद शमी याची भूमिका फारच महत्वाची होती.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद शमी याची भूमिका फारच महत्वाची होती.
मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला दिला झटका
तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मोहम्मद शमी मॅचचा हिरो ठरला. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅट्समन विकेट्स गमावत असताना मोहम्मद शमीने २७ रन्सची इनिंग खेळली. त्यामुळेच टीम इंडियाने २४७ रन्सपर्यंत मजल मारली. त्यानंतर त्याने ५ विकेट्स घेत आफ्रिकेला झटका दिला.
शमी ठरला मॅचचा हिरो
मोहम्मद शमीने आपल्या बॉलिंगच्या आधारे दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सला चांगलचं त्रस्त केलं. भलेही शमी मॅचचा हिरो ठरला असेल मात्र, तो राहत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्याच्या परिवाराला अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला आहे.
शमीच्या परिवाराचा अपमान
पश्चिम बंगाल सरकारने क्रीडा क्षेत्रात उत्तम कारगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने कोलकातामधील नेताजी स्टेडिअमवर २४ जानेवारी रोजी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात मोहम्मद शमीच्या परिवाराचा अपमान झाला आहे.
मोहम्मद शमीच्या परिवाराला आमंत्रण मात्र...
क्रीडा क्षेत्रात उत्तम योगदान देणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मोहम्मद शमीच्या परिवारालाही आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, शमी टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्याने तो अनुपस्थित राहीला आणि त्याचे कुटुंबिय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहीले.
खेळ सन्मान पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी मोहम्मद शमीच्या पत्नीला पुरस्कार स्विकारण्यासाठी बोलावण्यात आलं नाही. मात्र, असं कधीच होत नाही कारण, अनुपस्थित व्यक्तीच्या कुटुंबियांना हा पुरस्कार स्विकारण्यासाठी स्टेजवर बोलवण्यात येतं.