मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पाच सामने झाले असून पॉईंट टेबलमध्ये राजस्थाननं पहिलं स्थान मिळवलं आहे. पंजाब, कोलकाता आणि दिल्ली टीम त्याखालोखाल आहेत. मोहम्मद शमी गुजरात टीमकडून यंदा खेळत आहे. मोहम्मद शमीची अडल्ट स्टार जबरदस्त फॅन झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडल्ट स्टारनं केलेल्या ट्वीटमुळे शमी आणि या अडल्ट स्टारची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिच्या ट्वीटवर अनेक युजर्सनी तिची फिरकीही घेतली आहे. लखनऊ विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टीमला विजय मिळाला आहे. शमीने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. 


मोहम्मद शमीच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात आलं. शमीच्या फॉर्म पाहता त्याची चर्चा जगभरात सुरू आहे. त्याची सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर अडल्ट स्टार त्याची फॅन झाली आहे. अमेरिकन पोर्नस्टार केंड्रा लस्ट शमीच्या बॉलिंगची फॅन झाली. 




केंड्रा लस्टने ट्वीटकरून शमीसाठी खास मेसेजही लिहिला आहे. ती म्हणते, 'शमी तुझी कामगिरी खूप मस्त होती'. तिने इमोजी देखील या ट्वीटमध्ये वापरले आहेत. 


केंड्रा लस्टही 43 वर्षांची अमेरिकन पॉर्नस्टार आहे. ती अमेरिकेत खूप प्रसिद्ध आहे. पॉर्नस्टार व्यतिरिक्त दिग्दर्शकाचंही काम करते. 2012 मध्ये ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आली. ती सोशल मीडियावरही खूप जास्त अॅक्टिव्ह असते. 


केंड्राच्या या ट्वीटवर युजर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी म्हटलंय की भाई आम्हाला वाटतंय ही तुझ्या प्रेमात पडली आहे. तर दुसरा युजर म्हणतो की तुम्ही पहिल्या अमेरिकेतील अशी व्यक्ती आहात ज्या क्रिकेटवर काहीतरी चांगलं बोलत आहे. तर तिसऱ्याने ती तुझ्या प्रेमात पडलीय अशी कमेंट केली आहे. मोहम्मद शमीला पंजाब संघातून गेल्या वर्षी खेळला होता. यंदा गुजरातमधून खेळणार आहे.