इतिहास रचण्याच्या जवळ मोहम्मद शम्मी
भारतीय टीममध्ये वापसी करणारा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या जवळ आहे. चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये तो वनडे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा हॉलर बनू शकतो. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी त्याला ४ मॅचमध्ये १३ विकेट घ्याव्या लागणार आहेत.
मुंबई : भारतीय टीममध्ये वापसी करणारा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या जवळ आहे. चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये तो वनडे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा हॉलर बनू शकतो. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी त्याला ४ मॅचमध्ये १३ विकेट घ्याव्या लागणार आहेत.
शमीने आतापर्यंत ४७ वनडेमध्ये ८७ विकेट घेतल्या आहेत. या आधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या नावावर होता. त्याने ५२ मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला होता.
२०१५ वर्ल्ड कपमध्ये शमी आणि स्टार्कमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेण्याची स्पर्धा होती. त्यावेळेस हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या शकलेन मुश्ताकच्या नावावर होता. ज्याने ५३ मॅचमध्ये १०० विकेट पूर्ण केले होते. पण शमी वर्ल्ड कपमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे १५ महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे स्टार्कने बाजी मारली होती.
शमीने शेवटची वनडे २६ मार्च २०१५ ला 2015 को सिडनीमध्ये खेळली होती.