Mohammad Shami : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णतः फिट झाला असून तो आता क्रिकेटच्या मैदानावरील कमबॅकसाठी तयार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार बुधवारी मध्यप्रदेश विरुद्ध बंगालमध्ये होणाऱ्या सामन्यात मोहम्मद शमी पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आता शमीचे फॅन्स त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी उत्सुकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नव्हता. शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यातून बरं होण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी बरा होईल आणि तो भारतीय संघाचा भाग असेल असं म्हटलं जात होतं, मात्र  शमीने बंगळुरूच्या NCA मध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली आणि त्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. परंतु आता शमी पूर्णतः बरा झाला असून तो बुधवारी मध्यप्रदेश विरुद्ध बंगालमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळेल हंसी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. बुधवारी मध्यप्रदेश विरुद्ध बंगाल यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना पार पडणार आहे. होळकर क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळाला जाणार आहे. यात शमी कसा परफॉर्म करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


मोहम्मद शमीची कारकीर्द : 


मोहम्मद शमी हा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत भारताकडून 64 टेस्ट, 101 वनडे, 23 टी 20 सामने खेळेल आहेत. त्याने टेस्टमध्ये 229 विकेट्स, वनडेत 195 आणि टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतले होते. 34 वर्षांच्या शमीने आयपीएलमध्ये 110 सामन्यात एकूण 127 विकेट्स घेतले आहेत. 


हेही वाचा : भारताची अट पाकिस्तानने मान्य केली नाही, तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी


 


बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर


बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 


पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी