सोमवारी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सर्व भारतीयांनी हर घर तिरंगाच्या माध्यमातून तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. तर या अभियानाला देशवासियांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे भारतीय संघाच्या एका दिग्गज खेळाडूच्या पत्नीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या खेळाडूच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून हे आवाहन केले आहे. 


भारताचा वेगवाग गोलंदाज असणाऱ्या मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) देशाचे नाव बदलण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले आहे. हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या खाली तिने देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे.


"माझा देश, माझा आदर. माझे भारतावर प्रेम आहे आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असावे. पंतप्रधान, माननीय गृहमंत्री यांना विनंती आहे की भारताचे नाव बदला, जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणेल, इंडिया नाही," असे हसीन जहाँने म्हटले आहे.



दरम्यान, मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ अनेक दिवसांपासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहत होती. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री आहे.


मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. काही वर्षांनंतर तिने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत. 2018 साली मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.