नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याच्या पत्नीने हसीनने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हसीनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटोज आणि व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत.


शमीचे स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या आरोपांचे खंडन करत मोहम्मद शमीने लिहिले की, हे त्याच्या विरूद्ध रचलेले कारस्थान आहे. मात्र शमीवर झालेले हे गंभीर आरोप खुद्द त्याच्या पत्नीनेच केले आहेत की दुसरे कोणी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही बातमी व्हायलर होताच मोहम्मद शमीच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यात आले.



हसीनकडे आहेत पुरावे


त्याचबरोबर हसीनने शमीवर मारहाणीचाही आरोप केला आहे. हसीनकडे शमीविरोधात पुरावे असून त्यावरून त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे स्पष्ट होते. तसंच साऊथ आफ्रीकेच्या दौऱ्यावरून परत आल्यावर शमीने आपल्याला मारहाण केल्याचे हसीनचे म्हणणे आहे.