मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी सध्या एका कौटुंबिक विवादात अडकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याची पत्नी हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंध, मारहाण, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप लावले आहेत. त्यानंतर या दोघांचे वाद सतत चर्चेत आहेत. मात्र हे सगळे आरोप शमीने फेटाळून लावले आहेत.


नवीन माहिती आली समोर


हे प्रकरण मिटवण्याचा किंवा सोडवण्याचा शमीचा प्रयत्न सुरु आहे. पण मात्र त्यात आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरू आहेत. त्यातच शमीबद्दलचे अजून एक माहिती समोर आली आहे. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने कोलकत्ता पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यानंतर बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या फेब्रुवारी महिन्याचे शेड्यूल कोलकत्ता पोलिसांकडे रिपोर्ट केला आहे.


बीसीसीआयने केला खुलासा


ज्वाईंट सीपी प्रविण त्रिपाठी यांनी सांगितले की, मोहम्मद शमी १७-१८ फेब्रुवारीला दुबईत होता. त्याचबरोबर या प्रकरणासंबंधित इतरही गोष्टींचे चौकशी केली जात आहे. पण बीसीसीआयने सांगितले की, शमी वैयक्तिक कारणांसाठी दुबईत दोन दिवस होता. त्यामुळे त्याबद्दल काही माहीती बोर्डाकडे उपलब्ध नाही.


पाकीस्तानी महिला अलिश्बाने दुबईत घेतली भेट


मोहम्मद शमीच्या या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. पाकीस्तानी महिला अलिश्बा हीने दुबईत मोहम्मद शमीची भेट घेतल्याचे कबुल केले आहे.
आणि हाच आरोप शमीची पत्नी हसीन जहॉने केला होता.


पहा काय म्हणाली अलिश्बा


अलिश्बाने सांगितले की, मी शमीला भेटले होते. माझी बहीण दुबईत राहत असल्याने माझे दुबईत येणे-जाणे असते. व्यक्ती म्हणून शमी खूप चांगला आहे. मी त्याला आदर्श मानते आणि त्याची चाहती आहे. त्यामुळे मी जर त्याला भेटले तर मला नाही वाटत यात काही मोठी गोष्ट आहे.


तिने हे आरोप फेटाळले


त्याचबरोबर अलिश्बाने सांगितले की, ती फक्त शमीची चांगली मैत्रिण आहे. मात्र शमीसोबत हॉटेलमध्ये जाणे, राहणे हे आरोप तिने फेटाळून लावले आहेत. याबद्दल ती म्हणते की, मी दुबईत गेल्यावर सरळ माझ्या बहिणीच्या घरी गेले. सकाळी उठून एका हॉटेलमध्ये शमीसोबत नाश्ता केला. 


तो देशद्रोही नाही


त्याचबरोबर आमच्यात कोणताही पैशांचा व्यवहार झालेला नाही. जी व्यक्ती कधी खोटं बोलत नाही ती देशद्रोही कशी असू शकेल, असा प्रश्नही तिने विचारला आहे.