IND vs SL : रेकॉर्ड मोडल्यावर Mohammed Shami ने नेमकं कोणाला डिवचलं? LIVE सामन्यात काय झालं?
Mohammed Shami Viral Video : शमीने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स नावावर केल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा मोठा रेकॉर्ड मोडीस काढला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर शमीचा एक व्हि़डीओ (Viral Video) व्हायरल होत आहे.
IND vs SL World Cup 2023 : टीम इंडियाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला अन् सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. (Team India in WC 2023 Semi finals). शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर आणि श्रेयस अय्यरच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध आठ गडी गमावून 357 धावा केल्या. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजांनी भरघोस धावा केल्या, तर गोलंदाजांनीही धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. 'बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभानल्लाह' याचा प्रत्यय आजच्या सामन्यात पहायला मिळाला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेचा बाजार उठवला. शमीने या सामन्यात 5 विकेट्स नावावर केल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा मोठा रेकॉर्ड मोडीस काढला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर शमीचा एक व्हि़डीओ (Viral Video) व्हायरल होत आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमी भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांना मागे टाकून त्याने हा ऐतिहासिक विक्रम केला. शमीने स्पर्धेतील 14व्या डावात 45 विकेट घेतल्या. ज्यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 4 वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज बनलाय. त्याने माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना मागे टाकलंय. हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांनी 3 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. तर आता मोहम्मद सिराजने 4 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.
शमीने हरभजनचा रेकॉर्ड मोडताच बॉल हातात घेतला अन् स्टेडियमच्या दिशेने बॉल दाखवल. बॉल डोक्यावरून फिरवला. त्यामुळे शमीने हरभजन सिंग याला डिवचलं का? असा सवाल उपस्थित होतोय. समालोचकांनी हरभजनवर निशाणा साधत डिवचल्याचं सांगितलं. त्यावेळी भज्जी कॉमेट्री बॉक्समध्येच उपस्थित होता. तर सामना झाल्यानंतर शुभमन गिलने खुलासा केलाय. "शमीचा हावभाव आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी होता कारण त्याच्या डोक्यावर केस नाहीत", असं शुभमन गिल म्हणाला आहे. त्यामुळे शमीने नेमकं कोणाला डिवचलं? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, मोहम्मद शमीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 97 वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 24.08 च्या सरासरीने गोलंदाजी करताना 185 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 10 चार बळी आणि 4 बळी पाच बळींचा समावेश आहे.