आयपीएलमध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली असून, करिअरचे नवे दरवाजे उघडले आहेत. संघर्ष करुन क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचलेल्या अनेकांना आयपीएलच्या माध्यमातून आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. पण काहींच्या नशिबात मात्र अद्यापही संघर्ष लिहिला असून, त्यांना आणखी थोडे कष्ट घ्यावे लागणार आहेत. तसंच कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आयपीएल 2025 ची वाट पाहावी लागणार आहे. मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफही या कमनशिबी खेळाडूंच्या यादीत आहे. आयपीएलच्या लिलावात त्याला कोणीही खरेदी केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपमधील कामगिरीमुळे मोहम्मद शमी अद्यापही चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याच्या भावाच्या पदरी निराशा पडली आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी एकाही संघाने रस दाखवला नाही. यामुळे आयपीएलमध्ये तो अनसोल्ड खेळाडूंच्या यादीत राहिला आहे. 


मोहम्मद शमीचा भाऊ असल्याने 27 वर्षीय मोहम्मद कैफला संघात घेण्यासाठी संघांमध्ये चुरस होईल अशा अपेक्षा होत्या. पण बंगालच्या या जलदगती गोलंदाजावर कोणीच बोली लावली नाही. यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये अनसोल्ड राहिला.


मोहम्मद शमीच्या छोटा भाऊ मोहम्मद कैफ बंगालसाठी 9 सामने खेळले आहेत. 2021 मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण दुर्दैवाने तो आयपीएलमध्ये स्वत:ला जागा मिळवू शकला नाही. 


दुबईत आयपीएल 2024 चा लिलाव पार पडला. यावेळी एकूण 333 खेळाडू सहभागी झाले होते. यामधील 119 परदेशी खेळाडू होते. या आयपीएल लिलावात संघांनी एकूण 230 कोटी खर्च केले. यादरम्यान 70 खेळाडूंना विकत घेण्यात आलं. ज्यामध्ये 30 खेळाडू इतर देशातील होते.