India vs Sri lanka 3rd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 249 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो याने 96 धावांची खेळी केली. तर कुशल मेंडिस याने 59 धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला 50 ओव्हरमध्ये 248 धावा करता आल्या. तर भारताकडून डेब्यू स्टार रियान पराग याने 3 विकेट्स घेतल्या. मात्र, या सामन्यात चर्चेत राहिला तो मोहम्मद सिराज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली. पथुम 45 धावा करून बाद झाला. यानंतर अविष्का आणि मेंडिस यांच्यात 82 धावांची भागीदारी झाली. या दोन्ही भागेदाऱ्या रियान परागने मोडून काढल्या. टीम इंडियाला श्रीलंकेच्या धावांवर आवर घालण्यासाठी विकेट्सची गरज होती. त्यामुळे रोहित शर्माने पुन्हा मोहम्मद सिराजकडे विश्वासाने बॉल सोपवला. पण 39 व्या षटकात मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.


मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या डावातील 39 वी ओव्हर फेकली. या ओव्हरपूर्वी सिराजने 6 ओव्हरमध्ये 58 धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे सिराजने स्लेजिंगचा मार्ग निवडला आणि फलंदाज कुशल मेंडिस याला डिवचलं. काही वेळासाठी दोघांमधील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर विराट कोहलीने देखील नेहमीप्रमाणे अॅग्रेशन दाखवलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.



टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंका : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.