मुंबई : भारतात १२ महिने क्रिकेटचा मोसम असतो. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर इकडे तामिळनाडूत इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणे तामिळनाडू प्रीमिअर लीग (TNPL)सुरु आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये अनेक जबरदस्त खेळाडू पुढे येत आहेत. या लीगमधील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कॅच, विकेट आदींचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. मात्र, असा एक खेळाडू आहे की तो सध्या चर्चेत आहे. मोकित हरीहरण हा १८ वर्षीय खेळाडू त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. तो व्हीबी कांची विरंस टीमकडून खेळत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोकित हरीहरण हा आपल्या खास गोलंदाजीमुळे सध्या चर्चेत आहे. मोकित हा खेळाडू टीएनपीएलमध्ये डिंडीगुल ड्रेगंसविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही हाताने गोलंदाजी केली. डाव्या आणि उजव्या हाताने गोलंदाजी करताना त्याच्या शैलीत कोणताही फरक दिसून आला नाही. मोकितने चार षटकांत केवळ एक विकेट मिळाली. मात्र, त्याची बॅटिंग पाहिली तर डोळ्यांचे पारणे फिटले. त्याने ५० चेंडूनत ७७ धावा केल्या. त्यात त्याने ५ चौकार आणि ५ षटकार ठोकलेत.



दरम्यान, मोकित या दोन्ही हाताने गोलंदाजी करणारा खेळाडू नाही. निवेतन राधाकृष्णन हा ही तशी गोलंदाजी करतो. निवेतनला ऑस्ट्रेलियाच्या १६ वर्षांखालील टीममधून खेळण्याची संधी मिळाली.



२०१३ रोजी त्याचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले होते. त्यानंतर त्याचे नाते ऑस्ट्रेलिया क्रिकेटशी जोडले गेले. त्याने १४ व्या वर्षी तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये पर्दापण केले होते. ८ वर्षांचा असताना तो चेन्नईकडून खेळला. तो दोन्ही हाताने गोलंदाजी करतो. ६ वर्षांचा असल्यापासून तो क्रिकेट खेळतो.