दुबई : अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएलचा 55वा सामना रंगला. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने पहायला मिळाले. करो या मरोच्या परिस्थितीत मुंबई इडियन्सला प्लेऑफ गाठता आलं नाही. दरम्यान या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन टीममध्ये दिसला नाही. शेवटच्या क्षणी माघार घेत टीमची धुरा मनिष पांडेकडे सोपवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सर्वांच्या मनात अजूनही प्रश्न आहे की केन शेवटच्या सामन्यात मैदानात का उतरला नाही. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे, जर केन टीममध्ये असता तर मॅचचं रूप पालटलं असतं.


केन विलियम्सन संघातून बाहेर पडण्याचं कारण


सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला सामन्यापूर्वी वगळण्यात आलं. त्याच्या जागी संघाची कमान मनीष पांडेकडे सोपवण्यात आली होती. याचं कारण मनिष पांडेने टॉस दरम्यान सांगितलं.


मनिष पांडे म्हणाला, "केन खेळणार नाही हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. केनच्या हाताच्या कोपरात सूज आली. दरम्यान भुवनेश्वर कुमार देखील पूर्णपणे फीट नाही." दरम्यान याच कारणामुळे केन विलियम्सन शेवटच्या सामन्यासाठी मैदानात उतरला नव्हता.


सीझनच्या 55व्या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने 9 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. किशनने 32 बॉलमध्ये 11 चौकार आणि चार सिक्सच्या मदतीने 84 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 40 बॉलमध्ये 16 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. 


सनरायझर्स हैदराबादची टीम केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत 8 विकेटवर 193 धावाच करू शकली. कर्णधार मनीष पांडेने 41 बॉलमध्ये नाबाद 69 धावा केल्या. मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नीशम आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.