मुंबई : टीम इंडियाचा कोच हे पद किती मोठं असतं, याचा प्रत्यय आला आहे. कारण या पदासाठी बीसीसीआयकडे ५ ते ६ नाही, तर २ हजार लोकांनी अर्ज केल्याचं सांगितलं जात आहे. हा अर्ज करण्याची वेळ बुधवारी सायंकाळपर्यंतची होती. विशेष म्हणजे हा अर्ज करण्यात दिग्गज लालचंद राजपूत यांचा देखील समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता यात टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री यांच्याशिवाय हा प्रोफाईल दावेदार, ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी, न्यूझीलंडचे माजी कोच माईक हसन आणि याशिवाय भारतातून रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांचा समावेश आहे. पण काही नावं अशी देखील आहेत, जी या २ हजार अर्जात सामील नाहीत. ज्या नावांवर जोरदार चर्चा होत होती, त्या नावांचाच त्यात समावेश नाही.


सुत्रांच्या माहितीनुसार चर्चेत ज्यांचं जोरदार नाव होतं ते, श्रीलंकेचे महेला जयवर्धने यांचा अर्ज या यादीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार जास्तच जास्त परदेशी अर्जदारांचे अर्ज त्यांचे एजन्ट भरतात आणि त्यांच्या छाटणीत फार कमी वेळ लागतो.


गॅरी कर्स्टन यांचा अर्ज देखील या २ हजार अर्जात नाही. यात महत्वाची बाब आता सांगण्यासारखी हिच आहे, कितीही संख्येत अर्ज आले, तरी रवी शास्त्रींच्या नावाला स्पर्धक म्हणून टिकणारं एकच नाव आहे, ते देखील टॉम मूडी यांचं, याशिवाय कोणतंही मोठं नाव दिसत नाही. मुलाखतीसाठी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती सीएसीची स्थापना याआधीच झाली आहे.