MS Dhoni Autographing Superbike Video: भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंची नावं घेतल्यास महेंद्र सिंह धोनीचं नाव त्यामध्ये आवर्जून घ्यावं लागेल. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. क्रिकेट वगळता धोनीला बाईक रेसिंगचं आणि मोटरसायकलचं प्रचंड वेड आहे. धोनीकडे बाईक्सचं मोठं कलेक्शनही आहे. मध्यंतरी माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनीच्या रांची येथील घरातील 2 मजल्यांच्या इमारतीमधील बाईक कलेक्शन दाखवलं होतं. 


कौतुकाचा वर्षाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या याच बाईकप्रेमापोटी तो बाईकर्समध्येही चांगलाच चर्चेत असतो. अनेकदा धोनी दिसेल तिथेच त्याला ऑटोग्राफसाठी थांबवलं जातं. मग मिळेल त्या गोष्टीवर धोनीची स्वाक्षरी चाहते घेतात. काहीजण कागदावर, काहीजण टी-शर्टवर स्वाक्षरी घेतात. पण एका चाहत्याने चक्क त्याच्या 20 लाखांच्या ट्रम्प रॉकेट 3 आर बाईकवर धोनीकडून स्वाक्षरी मागितली. मात्र ही स्वाक्षरी करण्याआधी धोनीने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


धोनीने नेमकं केलं तरी काय?


व्हिडीओमध्ये धोनीला त्याचा चाहता ट्रम्प रॉकेट 3 आर या बाईकच्या विंडस्क्रीनवर स्वाक्षरी करायला सांगतो. मात्र ही बाईक पाहून भारावलेला धोनी आपल्या टी-शर्टने जिथे सही करायची आहे तो भाग पुसून घेतो. त्यानंतर तो थेट स्वाक्षरी न करता आधी बोटाने कशी सही करता येईल याची प्रॅक्टीस करतो. बाईकचा मालक उभी सही करावी असं सुचवतो. त्यावेळेस मागून कोणीतरी तसं केल्यास नंबर प्लेटमुळे सही झाकली जाईल असं म्हणतं. मग धोनी विंडशिल्डवर छोटी स्वाक्षरी करण्यासाठी पुढे सरसावतो आणि मी छोटीशी सही करतो असं म्हणतो. त्यावर मागून कोणीतरी 'तू कुठेही सही कर. कुठेही सही केलीस तरी ती छानच दिसेल,' असं म्हणत. बराच वेळ विचार केल्यानंतर धोनी या बाईकवर स्वाक्षरी करतो. धोनीने ज्या आपुलकीने या बाईकला आपल्या अंगातील टी-शर्टने पुसलं ते पाहून अनेकांनी कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे. 



कशी आहे ही सुपरबाईक?


स्वाक्षरी करुन झाल्यानंतर धोनी ही बाईक कशी आहे हे तिच्या मालकाकडून जाणून घेतो. धोनीने स्वाक्षरी केलेल्या बाईकची किंमत 19.90 लाखांपासून 20.80 लाखांपर्यंत आहे. या बाईकमध्ये 3 सिलेंडर लिव्हीड कुल्ड पेट्रोल इंजिन आहे. 165 बीपीएच क्षमता आणि 221 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता बाईकमध्ये आहे. या बाईकला 6 गेअर आहेत.