मुंबई : महेंद्रसिंग धोनीनं 100 स्टम्पिंगचा विश्वविक्रम केला. कोलंबो वन-डे त्यानं श्रीलंकेच्या अकिला धनंजयाला आऊट करत या विक्रमाला गवसणी घातली. लंकन टीमच्या कुमार संगकाराचा 99 स्टम्पिंगचा रेकॉर्ड मोडित काढत त्यानं नवा विक्रम प्रस्थापित केलं. 


301 व्या वन-डेत त्यानं हा कारनामा केला. धोनीनं संगकाराबरोबरच रोमेश कालुवितरना, मोईन खान आणि अॅडम गिलख्रिस्टलाही मागे टाकलंय. धोनीनं नुकतीच 300 वी वन-डे खेळण्याचाही पराक्रम केला होता. आता माहीनं आणखी एक रेकॉर्ड करत वन-डेतील आपणच बेस्ट विकेटकीपर असल्याचं सिद्ध केलंय.