MS Dhoni's Ferrari GTO 599: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याने भारतीय संघाला वनडे विश्वचषक, टी 20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या प्रमुख आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जला 4 वेळा आयपीएल विजेते बनवले आहे. असं असलं तरी महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीसह त्याच्या कार कलेक्शनचीही चर्चा होते. त्याच्याकडे एकापेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत. धोनीच्या कार कलेक्शनमध्ये असलेल्या एका कारची किंमत आणि टॉप स्पीड तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीचं कार कलेक्शन


धोनीने 2009 साली सुमारे 1 कोटी रुपयांना हमर H2 खरेदी केली होती. यानंतर त्याने अनेक उत्तम गाड्या खरेदी केल्या आहेत. हमर H2 व्यतिरिक्त, धोनीकडे फेरारी 599 GTO, पोर्शे 718 Boxster, ऑडी Q7, लँड रोव्हर फ्रीलँडर, सीएमसी Sierra, मित्सुबिसी आउटलेंडर, पजेरो SFX, टोयोटा कोरोला, कस्टम बिल्ट स्कॉर्पियो (Open), जीप ग्रँड चेरोकी आणि निसान जोंगा यासारख्या गाड्या आहेत. दिवसेंदिवस कार कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लिलावाद्वारे त्याने विंटेज लँड रोव्हर एसयूव्ही देखील खरेदी केली होती.


फेरारी 599 जीटीओ किंमत आणि टॉप स्पीड


फेरारी 599 GTO फक्त 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते. त्याचा टॉप स्पीड 335Km प्रति तास आहे, म्हणजे जर तो त्याच्या टॉप स्पीडवर असेल तर तो डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या अदृश्य होईल. फेरारी 599 GTO ची किंमत 3.57 कोटी रुपये आहे.