MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता वर्ग देशात आणि जगभरात आहे. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरील त्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते. आपल्या प्रत्येक छोट्या कृतीतून तो सर्वांची मने जिंकतो. आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो आणखीनच सर्वांना आवडू लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी हा क्रिकेटसोबतच व्यावसायिक जगतातही खूप यशस्वी आहे. क्रिकेट व्यतिरिक्त त्याचे अनेक व्यवसाय आहेत. हे व्यवसाय त्याने यशस्वीपणे चालविले आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्रात त्याची 800 कोटींची कंपनी आहे. माहीने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी पाहण्याची जबाबदारी तिच्या सासूला दिली आहे. साक्षीची आई शीला सिंह या कंपनीच्या सीईओ आहेत. चला जाणून घेऊया कोण आहे धोनीची सासू.


धोनीकडून कंपनीची जबाबदारी पत्नी आणि सासूला


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2020 पासून साक्षीची आई शीला सिंह कंपनीच्या सीईओ आहेत. महेंद्रसिंग धोनीने 800 कोटी रुपयांची धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चालवण्याची संपूर्ण जबाबदारी घरातील महिला शक्तीवर सोपवली आहे. धोनीची सासू शीला सिंग या कंपनीच्या सीईओ आहेत तर साक्षीही या कंपनीचे कामकाज पाहते. 


गेल्या 3 वर्षात कंपनीने चांगला व्यवसायही केल्याचे सांगितले जात आहे. धोनीची पत्नी साक्षी त्याच्या इतर अनेक व्यवसायांमध्ये समान भागीदार आहे. धोनीच्या चाहत्यांना ही बातमी कळाल्यावर त्याला डोक्यावर घेऊन कौतुक करायचेच राहिले आहे. बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये धोनीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तो आपल्या पत्नीच्या कुटुंबाचीही खूप काळजी घेतो, असे यातून दिसते.


तुम्ही देखील म्हणालं, 'जावई माझा भला'


धोनीची सासू शीला सिंग या आधी गृहिणी होत्या आणि त्यांच्याकडे नोकरीही नाही किंवा व्यवसाय चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. मात्र, गेली ३ वर्षे त्या धोनीच्या कंपनीची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. यात धोनीची पत्नी साक्षीही त्यांना साथ देत आहे. एखादा जावई स्वत:च्या कुटुंबासोबत बायकोच्या परिवाराचीदेखील काळजी घेत असेल तर तो एक चांगले उदाहरण तयार करत आहे. धोनीचे हे कृत्य पाहिल्यावर 'जावई माझा भला' असेच म्हणावे लागेल.


साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे आणि तिने काही काळ फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही काम केले आहे. धोनीशी लग्न केल्यानंतर ती त्याला त्याच्या वेगवेगळ्या व्यवसायात मदत करत आहे. एंटरटेन्मेंट कंपनीशिवाय धोनी शेती आणि कुक्कुटपालनासारखे अनेक व्यवसायही चालवत आहे.