MS Dhoni Fraud Case Against Mihir Diwakar : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. क्रिकेट अकाडमी स्थापन करताना केलेला करार न मान्य करून 15 कोटींची फसवणूक केल्याचा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) आणि सौम्या विश्वास (Saumya Vishwas) यांच्याविरुद्ध रांची न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता धोनी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचं पहायला मिळतंय. अशातच या प्रकरणात आता धक्कादायक ट्विट्स आता आहे. (MS Dhoni files criminal case against Mihir Diwaka allegedly been duped of Rs 16 crore)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र होता. त्यानंतर त्यांनी बिझनेस पार्टनर म्हणून काम केलं. सोशल मीडियावर त्याने धोनीसोबत अनेक फोटो देखील शेअर केले होते. मात्र, समोर आलेल्या प्रकरणामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. अशातच तमिलनाडूमध्ये माहिर दिवाकरविरुद्ध 5 तक्रारी आणि समन्स प्रलंबित असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आपण कोणाचीही फसवणूक केली नसल्याचा दावा करणाऱ्या मिहिरने तब्येतीच्या कारणास्तव एकदाही हजेरी लावली नाही.


श्रद्धा ग्लोबल एज्युकेशनल ट्रस्टने देखील मिहिर दिवाकर यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. धोनीचा लोगो आणि सपोर्ट असलेल्या शाळेच्या नवीन उपक्रमासाठी त्याने 35 लाख रुपये जमा केले होते. मात्र, दिवाकरने धोनीची प्रतिमा खराब केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहे.



दरम्यान, मिहिर दिवाकरने महेंद्रसिंग धोनीसोबत 2017 मध्ये जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. त्यानंतर मिहीरने धोनीच्या शर्ती आणि अटी झुगारून लावल्या. त्यानंतर धोनीने कारवाई करत 15 ऑगस्ट 21 रोजी मिहीर आणि त्याच्या कंपनीकडून सर्व हक्क काढून घेतले. त्यानंतर देखील मिहीरने धोनीच्या नावाचा वापर करून भारतात आणि परदेशात अनेक क्रिकेट अकादमी उघडल्या. त्यावेळी त्याने लाखोंमध्ये पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आलाय.