कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नाबाद १२४ रन्स आणि धोनीच्या नाबाद ६७ रन्समुळे भारताचा विजय सोपा झाला. रोहित शर्माचं हे १२वं शतक होतं. रोहितच्या या इनिंगमध्ये १६ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६७ रन्सच्या या खेळीमुळे धोनीनं मोहम्मद अजहरुद्दीनचा रेकॉर्ड मोडला आहे. सर्वात जास्त रन्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत धोनी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनीनं २९९ वनडेमध्ये ५१.५५च्या सरासरीनं ९,४३४ रन्स बनवल्या आहेत. अजहरनं ९,३७८ रन्स बनवल्या होत्या.


वनडेमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर(१८,४२६) राहुल द्रविड (११,२२१) आणि सौरव गांगुली(१०,७६८) आहेत. या रेकॉर्डबरोबरच धोनी एका टीमविरोधात सर्वात जास्त अर्धशतकं बनवणारा विकेट कीपर बनला आहे. धोनीनं श्रीलंकेविरोधात १८व्यांदा अर्धशतक झळकवलं. याआधी संगकारानंही भारताविरोधात १८ अर्धशतकं झळकावली होती.