चेन्नई : आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नईची टीम शानदार कामगिरी करत आहे. चेन्नईने मंगळवारी घरच्या मैदानात कोलकात्याचा ७ विकेटने पराभव केला. चेन्नईने ६ पैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे १० पॉईंट्ससह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असल्यानंतरही चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा नाराज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या खेळपट्टीवर धोनी खुश नाही. चेन्नईच्या मैदानात या मोसमात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचमध्ये कमी स्कोअर झाला आहे. चेन्नईमध्ये यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच मॅच झाली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये बंगळुरूला फक्त ७० रन करता आल्या. तर मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १०८ रनपर्यंतच मजल मारता आली.


चेन्नईच्या टीमने या मैदानात चारही मॅच जिंकल्या आहेत, तरीही धोनी या खेळपट्टीवर खुश नाही. 'अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळलं पाहिजे, असं मला वाटत नाही. या खेळपट्टीवर खूप कमी स्कोअर होत आहे. यामुळे आमच्या बॅट्समननाही खेळताना त्रास होत आहे. ड्वॅन ब्राव्होला दुखापत झाल्यामुळे आम्हाला टीमचं नियोजन करण्यातही अडचण येत आहे', असं धोनी म्हणाला.


पहिल्या चारही मॅचमध्ये चेन्नईचा विजय


चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये बंगळुरूचा ७० रनवर ऑलआऊट झाला. चेन्नईलाही या आव्हानाचा पाठलाग करायला १८ ओव्हरचा कालावधी लागला. दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईने दिलेल्या १७५ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १६७ रन करता आल्या. तिसऱ्या मॅचमध्ये चेन्नईने केलेल्या १६० रनचा पाठलाग करताना पंजाबने ५ विकेट गमावून १३८ रन केले.