MS dhoni on Ajinkya rahane : IPL 2023 मध्ये चेन्नईच्या टीमने मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसरा विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो मुंबईचाच प्लेअर अजिंक्य रहाणे. रहाणेने त्याच्या अप्रतिम खेळीने त्याने मुंबईच्या गोलंदाजंनाच्या नाकीनऊ आणलं. दरम्यान रहाणेच्या या खेळीचं कर्णधार एमएस धोनीने देखील कौतुक केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणे गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत होता. गेल्यावर्षी कोलकाता नाईड रायडर्सच्या टीममध्ये होता. मात्र यंदाच्या वर्षी  CSK फ्रेंचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. टीम इंडियामधून देखील रहाणेसा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 


रहाणेबद्दल काय म्हणाला धोनी?


रहाणेबाबत बोलताना धोनी म्हणाला, आयपीएलच्या सुरुवातीला अजिंक्य आणि मी चर्चा केली. त्यावेळी मी त्याला त्याच्या सामर्थ्यानुसार खेळण्याचा सल्ला दिला. मी त्याला तणाव न घेता खेळण्याचा आनंद घेण्यास सांगितला. 


धोनी पुढे म्हणाला, मुंबई विरूद्धच्या सामन्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी केली. मात्र तो ज्या पद्धतीने आऊट झाला त्यावर तो नाखूश दिसला. मला वाटतं की, प्रत्येक खेळ महत्त्वाचा आहे. यावेळी तुम्ही समोरच्या समस्यांकडे पहा योग्य ते पाऊल टाका. 


अजिंक्यची तुफान फलंदाजी


मुंबई विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. रहाणेने त्याच्या होम ग्राऊंडवर ही खेळी केली. अवघ्या 19 बॉल्समध्ये अजिंक्यने 52 अर्धशतक करत गोलंदाजांना चांगलंच धुतलं. मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या विजयानंतर बोलताना रहाणेने पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केलीये.


यावेळी भावूक होऊन रहाणे म्हणाला, आजच्या सामन्यात केलेल्या खेळीचा मी पुरेपुर आनंद घेतला. वानखेडे स्टेडियममध्ये खेळायला मला नेहमी आनंद होतो. मुख्य म्हणजे मी इथे एकदाही टेस्ट सामना खेळलो नाहीये. मला इथे टेस्ट सामना खेळयचा आहे. मी केवळ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी टायमिंगवर लक्ष दिलं पाहिजे. 


चेन्नईकडून मुंबई इंडियन्सचा पराभव


वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईचा त्यांच्यात घरात पराभव केला. टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने चेन्नईला 158 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य अजिंक्य रहाणेच्या वेगवान फलंदाजीमुळे 18.1 ओव्हर्समध्ये गाठलं.