मुंबई: जगातील सर्वात्तम कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलं जातं. IPL असो किंवा टीम इंडियाचं कर्णधारपद धोनीने ते यशस्वीरित्या सांभाळलं. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चाहत्यांची मोठी निराशा झाली. IPL 2021च्या चौदाव्या हंगामाच्या सुरुवातीलाच धोनी यंदा शेवटचं IPL खेळणार का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला. धोनी लवकरच चेन्नई सुपरकिंग्स संघ सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 'आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, 'सीएसके कायमच धोनीला आपल्यासोबत ठेवण्यासाठी तयार आहे. आज वाट्टेल तेवढे पैसे त्याच्यासाठी मोजायची तयारी देखील आहे. पण जर तुम्ही धोनीला विचारले तर तो मला सांगेल की आता तुम्ही मला संघात का ठेवत आहात. पुढील तीन वर्षे तो संघाबरोबर राहणार नाही.' असाही दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे. 


जर कोणत्या खेळाडूला रिटेन न करण्याचा नियम आला तर चेन्नई सुपरकिंग्स महेंद्रसिंह धोनीला आपल्याजवळ ठेवून घेईल. महेंद्रसिंह धोनीची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्स संघापासून झाली होती. आतापर्यंत सर्व IPLच्या हंगामात धोनीने CSKच्या संघाचं नेतृत्व सांभाळलं आहे. संघातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून धोनीकडे पाहिलं जातं. 


महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्स संघाने तीन वेळा विजयाची ट्रॉफी पटकावली आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नई संघाने IPLची ट्रॉफी जिंकली होती. यंदा तर धोनी IPLमधील 29 सामन्यांपैकी काही सामने फलंदाजी करताना पाहायला मिळाला. पुढच्या वर्षी तो खेळणार की नाही याबाबत सोशल मीडियावर आता चर्चेला उधाण आलं आहे. कर तीन वर्षांपर्यंत धोनी चेन्नईकडून खेळेल असं वाटत नाही असा दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे.