मुंबई : चेन्नईनं दिल्लीवर 91 धावांनी विजय मिळवला. आयपीएल 2022 मध्ये चेन्नईने हा चौथा विजय मिळवला आहे. चौथा विजय असला तरी प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण असल्याचंच दिसत आहे. या विजयानंतरही महेंद्रसिंह धोनीच्या चेहऱ्यावर काहीशी नाराजी पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला मोठ्या धावांच्या फरकाने विजय मिळाला. पण हा विजय आधी मिळाला असता तर बरं झालं असतं अशी खंत धोनीनं व्यक्त केली. फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मला पहिली फिल्डिंग हवी होती. मात्र टॉस हरल्याने दुसरा पर्याय नव्हता. 


ओपनर्सनी चांगली सुरुवात ज्याचा फायदा टीमला झाला. बॉलर्सनीची चांगली कामगिरी केली. हळूहळू सगळे तयार होत आहेत. टीमला मजबूती येत असल्याचंही धोनी म्हणाला. धोनीने यावेळी टीममधील खेळाडूंचं खूप कौतुक केलं. 


दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, मला अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा होती, आता आम्ही आमच्या पुढील तीन सामन्यांवर लक्ष केंद्रित करू. जर आम्ही ते जिंकले तर प्लेऑफपर्यंत पोहोचू. आधीच कोरोनामुळे टीममध्ये तणाव आहे. त्यामुळे सकारात्मक राहाणं आणि योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.