Shubhman Gill Wicket Video: पावसाच्या अडथळा आणल्याने रिझर्व्ह डे दिवशी आयपीएलचा फायनल (IPL 2023 Final) सामना खेळवला जात आहे. फायनलचा हायप्रेशर सामना (CSK vs GT) जिंकण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) घेतला होता. मात्र, गुजरातच्या सलामी जोडीने धोनीचा हा निर्णय फेल ठरवला. शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने आपला हुकमी एक्का बाहेर काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावर प्लेमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) आणि वृद्धीमान साहा (Vriddhiman Saha) यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली. पहिल्या 6 सामन्यात गुजरातने 62 धावा केल्या होत्या. आता चेन्नईला विकेट काढणं गरजेचं होतं. शुभमन गिल फॉर्ममध्ये आला होता. त्याचवेळी धोनीने सर्वात घातक गोलंदाजाला बॉलिंगसाठी आणलं. पावर प्ले संपताच धोनीने जडेजाच्या (Ravindra Jadeja) हातात बॉल सोपवला आणि शुभमन विरुद्ध ट्रॅप रचला.


शुभमन एकदा फॉर्ममध्ये आला की पुढे येऊन मारतो, हे धोनीला माहिती होतं. त्यावेळी त्याने जडेजाला पुढच्या टप्प्यावर बॉलिंग करण्याचा इशारा केला. 5 बॉलवर फक्त 5 धावा देऊन जडेजा बॉलिंग करत होता. त्यावेळी गिल 19 बॉलमध्ये 39 धावांवर खेळत होता. आऊटसाईड ऑफच्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभमनला क्रिझ सोडून पुढं यावं लागलं. त्यावेळी धोनीने चतुराईने हुकलेला बॉल पकडला आणि पापण्या लवण्याच्या आधी शुभमनचा स्टंप (MS Dhoni Stumping) उडवला. धोनीने फक्त 0.12 सेकंदात स्टंप उडवले.


पाहा Video



दरम्यान,  चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी गुजरातच्या 15 ओव्हरमध्ये 143 धावा झाल्या होत्या.


पाहा Playing XI:


गुजरात टायटन्स: 


ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी


चेन्नई सुपर किंग्स:


ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा