MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!
पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली.
Pilot's request to MS Dhoni on flight : आयपीएल (IPL 2023) सुरु झाली आहे आणि क्रिकेट प्रेमींना सध्या माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) फलंदाजीचा आनंद घ्यायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं की, अनेकांच्या तोंडात महेंद्रसिंग धोनीचं येतं. धोनी चेन्नईच्या टीमचा कर्णधार असून सीएसकेचे (Chennai Super Kings) देखील अनेक चाहते आहेत. सीएसकेने यंदाच्या सिझनमध्ये तीन सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान अशातच धोनीच्या बाबतीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
पायलटने धोनीला केली खास अपील
पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली. त्यामुळे विमानातील प्रवासीही चकीत झाली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी चैन्नई सुपर किंग्जची टीम ज्या फ्लाइटने मुंबईला येत होती त्याच फ्लाइटमध्ये ही घटना घडलीये. संपूर्ण टीमसोबत फ्लाइटमध्ये धोनी देखील उपस्थित होता. धोनी त्या फ्लाइटमध्ये असल्याची माहिती मिळाताच पायलटला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्याने धोनीबाबत खास घोषणा केली.
धोनी ज्या विमानात बसला होता, त्या विमानाचा पायलट देखील धोनीचा मोठा चाहता होता. यावेळी घोषणा करताना धोनीच्या या चाहत्याने त्यावा चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडू नये, अशी खास विनंती केली.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पायलट म्हणतोय की, 'मला आनंद आहे की, चेन्नई सुपर किंग्जची टीम आमच्या फ्लाइटमधून प्रवास करतेय. यावेळी मी धोनीला विनंतरी करतो की त्याने, CSK चं कर्णधारपद सोडू नये.
चेन्नईकडून मुंबईचा पराभव
शनिवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला. चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईला धूळ चारली. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. कालच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने चेन्नईला 158 रन्सचं लक्ष्य दिलं. दरम्यान अजिंक्य रहाणेच्या वेगवान फलंदाजीमुळे 18.1 ओव्हर्समध्येच चेन्नईचा विजय झाला.