नवी दिल्ली : कर्णधार जीन पॉल ड्युमिनी(नाबाद ६४) आणि हेनरिक क्लासेन(६९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाला सहा विकेटने मात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजय नोंदवून दक्षिण आफ्रिकेने टी-२० सीरिजमध्ये १-१ ने बरोबरी केलीये. पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १८९ रन्सचं टार्गेट दिलं होतं. तर दक्षिण आफ्रिका टीमने चार विकेटच्या नुकसानावर १८.४ ओव्हर्समध्येच हे टार्गेट पूर्ण केलं. 


पांडे-धोनीची दमदार खेळी


या सामन्यात टॉक हरल्यावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने मनीष पांडे(नाबाद ७९) आणि महेंद्र सिंह धोनी(नाबाद ५२) च्या अर्धशतकीत खेळीच्या जोरावर २० ओव्हर्समध्ये चार विकेटच्या नुकसानावर १८८ रन्स केले होते. सेंच्युरियनच्या मैदानावर ब-याच दिवसांनी धोनीचा विस्फोटक अंदाज बघायला मिळाला. धोनीने या दमदार खेळीत फोर आणि सिक्सरचा पाऊस पाडला. 


टीम इंडियाच्या स्वस्तात तीन विकेट


टीम इंडियाच्या ४५ च्या स्कोरवर तीन विकेट(रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली) गेल्या. अशात पांडे मैदानात आला. त्याने चौथ्या विकेटसाठी रैनासोबत ४५ रन्सची भागीदारी केली. आणि टीमचा स्कोर ९० वर पोहोचला. अशातच लय पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरेश रैनाला अंदिले फेहुलकवायोने ९० च्या स्कोरवर एलबीडब्ल्यू केले. अशात पांडे एकीकडून खेळत होता. 


धोनीची फटकेबाजी


नंतर मनीष पांडे आणि धोनी यांनी सोबत ९८ रन्सची भागीदारी केली. धोनी आणि पांडे नाबाद राहिला. या खेळीत पांडेने ४८ बॉल्समध्ये सहा फोर आणि तीन सिक्सर लगावले. तर धोनीने आपल्या टी-२० करिअरचं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने २८ बॉल्समध्ये चार फोर आणि तीन सिक्सर लगावले. 


...आणि धोनी संतापला


या मैदानात धोनीच्या आक्रामक फलंदाजीसोबत शेवटच्या ओव्हरमध्ये रागही बघायला मिळाला. अनेकदा आपण बघतो की, धोनी मैदानात खूप शांत असतो. त्यामुळेच त्याचा कॅप्टन कूल असं म्हटलं जातं. पण सेंच्युरियनमधील सामन्याच्या शेवटी धोनी वेगळ्याच रूपात बघायला मिळला. 


का संतापला धोनी?



झालं असं की, सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा धोनी स्ट्राईकवर होता, तेव्हा त्याने राग व्यक्त करत स्कोरबोर्डकडे बघणा-या  मनीष पांडेवर चांगलेच झापले. धोनी त्याला म्हणाला की, ‘ओए, तिकडे काय बघतोय, इकडे बघ, आवाज नाही येणार, इशारा बघ’. यावेळी धोनी चांगलाच रागात दिसत होता.