नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या बंगळुरु स्थित एनसीएमध्ये चांगलाच घाम गाळतोय. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ कसोटीनंतर पाच वनडे आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी वनडे आणि टी-२० संघात आहे. यामुळेच धोनी सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष देतोय. यादरम्यान त्याने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 


यातील एका फोटोत धोनी इतर खेळाडूंसह डायनिंग टेबलावर बसलेला सेल्फी काढलाय. तसेच एनसीएच्या सर्व टेस्ट पूर्ण केल्यात. २० मीटरची रनिंग २.९१ सेकंदात पूर्ण केली. अशा तीन रनिंग पूर्ण केल्या. ही वेळ लंचची आहे, असं तो ट्विटरवर म्हणालाय.