मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी सध्या बॅटींगमधून आपल्या चाहत्यांना खूश करु शकत नाहीए. याचे वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहे. फलंदाजीला उतरण्याचा त्याचा क्रम याला कारणीभूत आहे किंवा धोनी पहिल्यासारखा फिट नाही अशा चर्चा रंगल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यातही धोनीने चाहत्यांचा भ्रमनिराश केला. त्यानंतर धोनीने निवृती घ्यावी अशी मागणी होऊ लागली. पण आता तर थेट माजी बॅट्समन व्ही. व्ही. एस लक्ष्मण यानेच धोनीला टी २० तून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 


 न्यूझीलंडविरूद्ध राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी -२० सामन्यात धोनी धीम्या गतीने खेळल्याने सोशल मिडियावर खूप टीका झाली. धोनीचा अशा पद्धतीचा खेळ पाहून त्याने टी २० खेळणे सोडायला हवे असा सल्ला व्हीव्हीएस लक्ष्मण याने दिला आहे.


यावर आगरकर यानेही शिक्कामोर्तब करत धोनीने टी २० खेळणे सोडायला हवे असे म्हटले आहे. 


व्ही.व्ही.एस. लक्ष्मण म्हणतो, "मला वाटते की धोनीने आता टी २० क्रिकेटमधून निवृत्त व्हायला हवे  आणि युवा खेळाडूंना त्याजागी संधी मिळायला हवी. पण त्याने एकदिवसीय क्रिकेट सामने खेळायला हवे. तो भारतीय एकदिवसीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे.